पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 6800 कोटीची केंद्राकडे मागणी

महाराष्ट्र
 13 Aug 2019  376

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 6800कोटी रुपयांची केंद्राकडे मागणी 

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठीत 

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई 13 प्रतिनिधी 

राज्यातील विविध जिल्ह्यात आलेल्या पाऊसामुळे उद्धवस्त झालेल्या गावांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे 6800 कोटी रुपयांची मागणी केली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आहे.

  मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना सदर माहिती दिली. सन 2005 च्या घटनेशी तुलना केली तर  अभूतपूर्व पाऊस थोड्या कालावधीत पडला आहे.

प्राथमिक माहितीनुसार memorandum केंद्राला पाठवत असून  दोन भाग करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले . कोकण, नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्रच्या भागसाठी 2105 कोटी रुपयांची आणि कोल्हापुर, सांगली आणि सातारा यासाठी 4700 कोटी रुपयांची मागणी केंद्राकडे करत आहोत. अशी एकूण 6800 कोटी रुपयांची मागणी एकूण केंद्राकडे करत असल्याचे यावेळी सांगितले.

      पुरात मोठ्या प्रमाणात जनवारे मृत पावले आहे. परंतु पोलीस पाटील किंवा सरपंच यांनी जरी जनावरांच्या नुकसनाबद्दल जरी सांगितलं तरी ते ग्राह्य धरून तशी नुकसान भरपाई दिली जाईल असेही यावेळी सांगितले.मुख्यमंत्र्यांनी  मानले केंद्र सरकार आणि विविध संस्थांचे आभार, ( नौदल , वायू दल NDRF वगैरे....) जेवढी मदत मागितली तेवढी उपलब्ध करून देण्यात आली.

काही मर्यादित वेळेत पूरग्रस्त भागातील पूर्णबांधणी करणार, मंत्रिमंडळमधील काही मंत्री वेळोवेळी तिथे असतील.

एक विशेष तज्ञ समिती तयार करण्यात येणार , समितीमधील नावे लवकरच निश्चित केली जातील.

एवढा पाऊस थोड्या दिवसांत झाला, वातावरणातील बदल वगैरे यांचा अभ्यास करेल, काय उपाययोजना केल्या पाहिजेत हे सांगेल असेही यावेळी सांगितले.

मंत्रिमंडळ उपसमिती ही मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे. जी पूरग्रस्त भागाच्या मदतीबाबत आवश्यक निर्णय घेतले जातील, GR मध्येसुधारणा, काही निर्णय ऐनवेळी घेतले जातील.