पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुणे अन्न व औषध प्रशासनही सरसवाले

महाराष्ट्र
 10 Aug 2019  524

पुरग्रस्तांच्या मदतीला पुणे अन्न व औषध प्रशासनाचाही हातभार 

* 1500 वाहन चालकांसाठीही जेवण 

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई 10 ऑगस्ट 

 कोल्हापुर आणि सांगली भागात महापुराने कहर केला आहे.अनेकांचे घर उधवस्त झाले असून त्यांना जेवनापासून तर औषधी पर्यन्त सर्वच आवश्यक वस्तूंची गरज भासत आहे.राज्यातील सर्वच स्तरातून मदतीचा हात पुढे येत असतांना पुणे विभागीय अन्न व औषध प्रशासनही मदतीसाठी सरसवाले आहे.

अन्न व औषध प्रशासन सातारा यांनी अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त सुरेश  देशमुख सर यांचे पुढाकाराने व अन्न व्यावसायिक यांचे  समन्वयाने  पुरग्रस्थ भागासाठी खालील प्रमाणे मदत केली
1 पुणे बेंगलोर हायवेवर 1500 वाहन धारकांना जेवण तसेच सोबत 5 लिटर   पाण्याचे  चे 200 जार आज दिले
2. 5 लिटर पाण्याचे 800 जार तसेच पार्ले बिस्कीट चे 50,000 पॅकेट्स जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे आज जमा होत आहे
3. तसेच पार्ले बिस्कीट चे 15,000 पॅकेट आज  खाजगी वाहनाने सांगली येथे पाठविण्याची व्यवस्था केली आहे , आज सायंकाळ पर्यंत पोहोच होतील.
4. 1 टन खाकरा इस्लामपूर पर्यंत पोहचला आहे, वाहतूक अडचणी मुळे  तेथे उतरवला आहे ,लवकरच पुरग्रस्थ ठिकाणी पोहोचवण्याची व्यवस्था होईल 
5. फलटण येथे पाणी बॉटल चे बॉक्स तयार आहेत. वाहनाची व्यवस्था झाली की पुरग्रस्थ भागात पोहोच होईल.
6. किरकोळ किराणा असोसिएशन सातारा यांनी अन्न व औषध प्रशासन यांनी केलेल्या आवाहन नुसार पाटण तालुक्यातील पुरग्रस्थ गावांसाठी दैनंदिन किराणा वस्तू पुरविल्या आहेत