ते बॉक्स आणि डबे स्व राजाराम बापूंच्या शताब्दी सोहळयातले

महाराष्ट्र
 10 Aug 2019  646

आपले फोटो असलेले बॉक्स आणि डबे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रिंट केलेले नाही  

* आमदार जयंत पाटील यांचा खुलासा 

लोकदूत वेबन्यूज टीम 

सांगली 10ऑगस्ट 

     

कोल्हापुर आणि सांगली जिल्ह्यातील पुरग्रस्त कुटुंबियांना मदतीसाठी आमच्याकडून आवश्यक ती मदत पुरवत आहे. सोशल मिडिया मध्ये ज्या मदतीच्या बॉक्स वर आणि डब्यांवर माझे फोटो आहे ते डबे आणि बॉक्स हे स्व राजाराम बाबू पाटील यांच्या 1 ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या शताब्दी सोहळ्यात तयार केलेले होते. त्यातून काही डबे आणि बॉक्स उरलेले डबे आणि बॉक्स पुरग्रस्त कुटुंबियांना देण्यात येत असलेल्या मदतीसाठी वापरले आहे. मात्र पुराग्रस्त बांधवांना भगिनींना मदत करण्यासाठी व त्या माध्यमातून आपली प्रसिद्धी करण्याचा आपला कुठलाच मानस नसून त्यासाठी हे बॉक्स आणि डबे वरील फोटो प्रिंट केले नाही. असा खुलासा आमदार जयंत पाटील यांच्याकडून करण्यातaआला आहे.

    जे फोटो असलेले डबे आणि बॉक्स वर फोटो असल्याचे सोशल माध्यमांत फिरत आहे. ते स्व राजाराम बापू पाटील यांच्या शताब्दी सोहळ्यासाठी प्रिंट केले होते.परन्तु उरलेल्या डब्यांचा आपण मदतीसाठी वापर केला. पण यांचा भाजपच्या आयटी सेल ने विपर्यास करुण व्हायरल केलाaअसल्याचा आरोप त्यांच्यामार्फत करण्यात आला आहे. सरकारने मदत पाठवायला उशीर केल्यामुळे मोठी अड़चन झाली त्यावरून लक्ष वळविण्यासाफी चुकीच्या पद्धतीने जुने फोटो व्हायरल केले जात असल्याचे जयंत पाटील यांच्यामार्फत करण्यात आला.