पुरग्रस्तांच्या मदतीवरही आमदार,प्रांत व तहसीलदार यांची स्टिकरबाजी ?

महाराष्ट्र
 10 Aug 2019  1245

पुरग्रस्तांसाठी जाहीर झालेल्या शासकीय मदतीवर अधिकारी आमदारांची स्टिकरबाजी 

* पुरग्रस्तांच्या परिस्थितीचे गांभीर्य नाही,सर्वचस्तरातून संतप्त भावना 

लोकदूत वेबन्यूज टीम 

 मुंबई 10ऑगस्ट 

 

 कोल्हापूर अन् सांगलीतीलपूरस्थितीने संपूर्ण  महाराष्ट्रतील जनता हळहळली  आहे. मात्र यात पुरग्रस्तांसाठी शासनाकडून मदत  जाहीर  केली आहे. यात 10किलो गहु व 10किलो तांदूळ पुरग्रस्त कुटुंबांना देण्यासाठी तयार केलेल्या पाकिटांवर मात्र भाजप चे इचलकरंजीचे आमदार सुरेश हळवणकर स्थानिक उपविभागीय अधिकारी  समीर शिंगटे व् तहसीलदार सुधाकर भोसले यांनी शासनाच्या या मदतीवर आपले नाव आणि फोटो असलेले स्टिकर लावले आहे. यावर सर्वच स्तरातून संतप्त भावना व्यक्त केल्या जात असून या स्टिकरबाज अधिकाऱ्यांवर मुख्यसचिवांनी तर आमदारांवर पक्षाने  कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.

कोल्हापूरकर आणि सांगलीकरांच्या घरात शिरलेले  पाणी आणि महिला व बालकांचे हाल पाहून राज्यातील विविध भागातील जनतेच्या डोळ्यात अश्रु आले  आहे. परंतु यावरच न थांबता सर्व जनतेनी माणुसकीचे दर्शन घडवत विविध प्रकारची मदत पाठविण्यासाठी हात पुढे केले आहे. सोशल मीडियाच्या मदतीने आपली मदत पूरग्रस्त बांधवांपर्यंत पोहोचावी हा उद्देश ठेऊन विविध सामाजिक संस्था, संघटना आणि देवस्थान व्यवस्थापन पुढाकार घेत आहेत. परंतु पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी स्वत:ची जबाबदारी अन् कर्तव्य असलेल्या आमदार आणि प्रांत,तहसीलदार यांनी  चक्क सरकारी मदतीवर नाव आणि फोटो असलेले स्टिकर लावून जाहिरातबाजी करुन पूरग्रस्तांना मदत पाठविली जात आहे. सरकारने पुरग्रस्त जनतेची  भूक भागविण्यासाठी मदतीचा हात देऊ केला आहे. मात्र, सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या या मदत पॅकेटवरही आमदार हळवनकर,प्रांत अधिकारी शिंगटे व तहसीलदार भोसले यांनी  केलेल्या जाहिरातबाजीवर गहू आणि तांदुळाच्या पॅकींगवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो असलेले स्टीकर लावले. शिवाय  प्रांताधिकारी शिंगटे आणि तहसिलदार सुधाकर भोसले यांचे यांचीही नावे टाकून जाहिरातबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे गांभीर्य हरवून जाहिरातीचे उपद्रव सुचलेल्या या अधिकाऱ्यांवर मुख्य सचिव आणि आमदारांवर पक्षाने कारवाई करावी अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.