लोकदूत.इन इफेक्ट - सनदी अधिकारी माने यांच्या नियुक्तीत बदल

महाराष्ट्र
 09 Aug 2019  659

मुख्यमंत्र्यांनी केल्या 2सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या 

* विश्वजित माने यांची औरंगाबाद येथे नियुक्ती 

* लोकदूत. इन इफेक्ट 

लोकदूत वेबन्यूज टीम 
मुंबई 9 ऑगस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे. म्हाडाच्या दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या सीओ पदी नियुक्ती दिलेल्या आदेशात अंशतः बदल करून  अहमदनगर जिल्हा परिषद सीईओ विश्वजित माने यांना औरंगाबाद येथे सेल्स टॅक्स विभागाच्या सहआयुक्त पदी पाठविण्यात आले आहे.तर दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या सीओ पदी वैद्यकीय रजेवरुन परत आलेले सतीश लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.    
       अहमदनगर जिल्हा परिषद सीईओ असतांना निवृत्त सैनिक दादासाहेब घाडगे यांना एका अपघातात अपंगत्व आले. यात हात निकामी झाल्याने त्यांना जेवणासह अन्य दैनंदिन जगण्यात अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे  त्यांनी जिल्हा परिषदेत शिक्षिका असलेल्या पत्नी अरुणा घाडगे यांची जवळच असलेल्या गावातील शाळेत रिक्त पदी नियुक्ती दिल्यास मदत होईल अशी विनंती केली. यासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्षा आणि अन्य सदस्यांनी सीईओ विश्वजित माने यांना विनंती केली होती.मात्र त्यांनी अमान्य केल्यामुळे संतप्त झालेल्या सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्यांनी माने यांच्यावर अविश्वास ठराव मांडून त्यांच्या नियुक्तीस विरोध केला होता. परंतु शासनाने त्यांना अतिशय महत्त्वाची पोस्ट समजल्या जाणाऱ्या म्हाडा येथे नियुक्ती देण्यात आली होती. यावर लोकदूत.इन या वेबन्यूज ने बातमी प्रसारित केली होती. मात्र शासनाने दखल घेऊन त्यांच्या नियुक्तीत बदल करून सरकला  सैनिकांबद्दल आदर असल्याचे दाखवून दिले.