राज्यात शांतता पाळा - गृहमंत्री

महाराष्ट्र
 11 Feb 2022  273

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आवाहन

लोकदूत वेबटीम 

मुंबई 11 फेब्रुवारी 

आपण अनावश्यकदृष्ट्या जाती-धर्मात तेढ निर्माण करायला लागलो तर समाजात एक दुही तयार होते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी समजून घेतले पाहिजे, असे  सांगत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी  राज्यात शांतता राखण्याचे आणि  सामंजस्यपूर्ण भूमिका घेण्याचे आवाहन केले.

कर्नाटकात मुस्लिम समाजाच्या विद्यार्थिनींनी हिसाब परिधान करण्याच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असून त्याचे पडसाद राज्यात उमटले आहेत. हिसाब विरोध आणि त्याच्या समर्थनार्थ राज्यात मालेगाव, बीडमध्ये आंदोलन झाले. राजकीय पक्षांनीही  यासंदर्भात आपापल्या भूमिका मांडल्या आहेत. या पार्शवभूमीवर वळसे पाटील यांनी आज जनतेला शांततेचे आवाहन केले. 

 अशाप्रकारचे आंदोलन कुणी  करू नये.  राजकीय पक्षांनीही राज्यात विनाकारण अस्वस्थता निर्माण करून पोलिस विभागाचे काम वाढवू नये तसेच शांतता पाळण्यासाठी सहकार्य करावे, अशी  विनंतीही  वळसे पाटील यांनी केली आहे.