नाशिक एसपी पाटील यांची धड़क कारवाई

महाराष्ट्र
 17 Jan 2021  267

*दिड कोटीचा गुटखा जप्त

लोकदूत वेबटीम 

मुंबई 17 जानेवारी 

 

नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना प्राप्त गुप्त माहितीचे आधारे दि. 16/01/2021 रोजी रात्रीचे सुमारास नाशिक ते सापुतारा महामार्गावर राजस्थान येथुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा व सुगंधी तंबाखु घेवुन दोन कंटनेर नाशिकच्या दिशेने येत असल्याची
खबर मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने करंजखेड फाटा, ता दिंडोरी परिसरात सापळा रचून 02 कंटेनर ताब्यात घेतले. सदर दोन्ही कंटनेरची झडती घेतली असता त्यामध्ये मिराज कंपनीचा 1,24,34,730/- रूपये किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा सुगंधीत तंबाखुचा साठा मिळुन आला. सदर अवैध साठा घेऊन जाणारे ४ इसम नामे 1) महेंद्रसिंग शंबुसिंहानी सोलंकी, रा. उदयपुर, राजस्थान, 2) शामसिंग चतुरसिंहजी राव, रा. बिदसर, चितोडगड, राजस्थान, 3) अर्जुनसिंग जसवंतसिंग राणावत, रा. चितोडगड, राजस्थान, 4) लोगलजी मेहवाल, रा. उदयपुर, राजस्थान यांना ताब्यात घेवुन त्यांचे कब्जातुन प्रतिबंधीत गुटखा सुगंधीत तंबाखुचा साठा व दोन कंटनेर वाहन असा एकुण 1,64,34,730/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर बाबत वणी पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार पुढील तपास करीत आहे.