तळीरामांनो...मद्य घ्यायचे तर टोकन घेण्यासाठी रांगेत उभे रहा

महाराष्ट्र
 05 May 2020  362

* एका दिवसात 400 ग्राहकांनाच मिळणार मद्य 

* मद्य खरेदी आणि विक्री करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने घातल्या अटी 

* टोकन पद्धतीचा वापर करावा लागणार 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 5 मे 

 लॉकडाउन 3 लागु करतांनाच राज्यात मद्य विक्रीसाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यात सुरु झालेल्या मद्य विक्रीमुळे तळीरामांची चांगलीच गर्दी उसळल्याने राज्यात ठीक ठिकाणी सामाजिक अंतराच्या नियमांचा फज्जा उडाला आहे. यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने काही नियम घालून दिले असून एका दिवसात केवल 400 मद्यपी ग्राहकांनाच मद्य विक्री करता येणार आहे. शिवाय मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकाला टोकन पद्धतीने मद्य देण्याचे  बंधन घातले गेले आहे.

         मद्य खरेदी करतांना सर्व नियमांचे पालन करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमप यांनी काही अटी लागु केल्या आहे. त्यानुसार

मद्य विक्री करणाऱ्या शॉप मालकांनी सामाजिक आंतराचे पालन करण्यासाठी 6 फुटांचे मार्किंग करावे लागणार आहे.

मद्य विक्री सुरु करण्याआधी खरेदी कारणाऱ्याला मार्किंग मध्ये उभे राहण्यास सांगावे लागणार आहे.

मद्य खरेदी साठी उभ्या असलेल्या ग्राहकांकडून मद्य घेण्यासाठी मागणीपत्र भरून घ्यावे लागणार आहे. यात त्याचा रांगेतील अनुक्रमांक,पूर्ण नाव,मोबाईल नंबर आणि कोणत्या ब्रैंड चे आणि किती मद्य हे नमूद केलेला अर्ज भरून त्यावर त्याचा टोकन नंबर टाकून घ्यावा लागणार आहे.त्याच बरोबर बोर्ड वर कोणत्या क्रमांकाच्या टोकन ला मद्य दिले जाणार हेही नमूद करावे लागणार आहे.

    त्यानंतर मद्य विक्री करणाऱ्याने टोकन नुसाराच मद्य विक्री करने बंधनकारक असून एका तासाला 50 तर दिवसाच्या आठ तासात केवळ 400 ग्राहकांनाच मद्य विक्री करावी लागणार असून उर्वरित ग्राहकांना दुसऱ्या दिवशी ठरवून दिलेल्या पद्धतीनेच मद्य विक्री करावी लागणार आहे. दुकानाजवळ गर्दी होऊ नए यासाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी लागणार असून उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचारी व् अधिकाऱ्यांकडून सामाजिक आंतर पालनचे नियम पाळले जात आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी विभागाकडून नियुक्ती केली जाणार आहे.