"झिंग तो मी ...",राज्यात मद्यपींनी रिचवले ६२ कोटींचे मद्य

महाराष्ट्र
 05 May 2020  373

#  "एकच प्याला" म्हणत राज्यात ६२ कोटी ५५ लाखांची मद्यविक्री 

लोकदूत वेबटीम 

मुंबई ५ मे 

  राज्यासह  देशात कोरोनाचा कहर पाहता महाराष्ट्र राज्याला  सर्वाधिक  फटका बसला आहे. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊन मुळे वणवण भटकंती होत  असलेल्या राज्यातील मद्यपींना राज्य सरकारने दिलासा देताच, राज्यात सर्वत्र जणू मद्यपींचा जणू जनसागरच उसळल्याचे चित्र पहायला मिळाले."झिंग तो मी कळेना कशाला,जीवनाचा रिकामाच प्याला" या गजल प्रमाणे उत्साह संचारल्यागत मद्यापिणी मद्य विक्रीची परवानगी देतात दोन दिवसात तब्बल ६२ कोटी ५५ लाख रुपयांचे मद्य  खरेदी केले आहे. राज्यातील मद्यप्रेमीनी सोमवार आणि मंगळावर या दोन दिवसात १६.१० लाख लिटर मद्य घशाखाली रिचवली असल्याची अधिकृत आकडेवारी  राज्याच्या उत्पादन शुल्क आयुक्त कार्यालयने दिली आहे.

      मद्य विक्रीतून  राज्याला कर स्वरुपात मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो.  गेल्या 22 मार्च पासून राज्यात मद्य विक्री बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे 3 में पर्यन्त राज्यात कुठल्याही प्रकारचे मद्य विक्री शॉप सुरु नसल्याने राज्यातील मद्यप्रेमींची मोठी अड़चन झाली होती. परंतु लॉकडाऊन 3 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या क्षेत्रात काही  प्रमाणात म्हणजेच केवळ मद्य विक्री करणाऱ्या अधिकृत परवाना असलेल्या शॉपला मद्य विक्री करण्याची मंजूरी राज्य सरकारने दिली. या निर्णयामुळे कोरोनाच्या भीतीने घरात बसलेल्या मद्यप्रेमींना चांगलाच आनंद झाला. सोमवारी आणि मंगळवारी राज्यात सर्वत्र मद्य विक्री करणारे शॉप उघडण्या आधीच मोठ मोठ्या रांगा मध्यपींनी लावलेल्या पहायला मिळाल्या. यामुळे काहीं भागात पोलिसांनी परिस्थिती हातात ठेवण्यासाठी लाठीचार्ज केला. तर  काही शहरात आणि जिल्ह्यात स्थानिक निर्णय अधिकाऱ्यांनी मद्य विक्रीची परवानगी नाकारली. तरी सुद्धा राज्यातील एकूण 10822 परवाना मद्यशॉप पैकी 3543 मद्य विक्रीशॉप राज्यभरात सुरु केले गेले. यात देशी मद्य व् किरकोळ विक्री दुकाने 1111,वाइन शॉप 718, बियर शॉप 1713, फ़क्त वाइन विक्री करणारे 1 या मद्य विक्री करणाऱ्या शॉप चा समावेशaआहे. 36 जिल्ह्यापैकी चंद्रपुर,वर्धा आणि गडचिरोली हे कोरडे जिल्हे वगळता उर्वरित 33 जिल्ह्यात मद्यविक्रीची परवानगी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली. मात्र यात सोलापुर,सतारा,औरंगाबाद,जालना,बीड,नांदेड,परभणी,हिंगोली,नागपुर या जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी कोटोनाचा प्रादुर्भाव असल्याने मद्य विक्री करण्यास नकार दिला. तर मद्यप्रेमींची गर्दी उसळल्याने लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात मद्य विक्री बंद करण्यात आली.