मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीवरुण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सावध भूमिका

महाराष्ट्र
 30 Apr 2020  464

* विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहिर करा 
* राज्यपाल  भगतसिंग कोश्यारी यांची इसीआय ला विनंती 
लोकदूत वेबटीम 
मुंबई 30 एप्रिल 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेचे सदस्यत्व मिळण्यावरून राज्यातील राजकीय परिस्थिती ढवळून निघत आहे. त्यात मुख्यमंत्र्यांना आमदारकी मिळेल की नाही यावर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशा  अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र  पाठवून पुढे ढकललेल्या 9 विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहिर करण्याची विनंती केली आहे. यामुळे राज्यातील राजकरण आणखी नव्या वळणावर उभे राहिले असल्याने केंद्रीय निवडणूक आयोग काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 
       महाविकास आघाडीचे सरकार विराजमान होऊन सरकारचे नेतृत्व मुख्यमंत्री पदाची धुरा  उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेम्बर रोजी होती घेतली. वजधान सभा किंवा विधान परिषदेचे आमदार नसतांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने 6महिन्याच्या आत दोन पैकी एका सभगृहाचे सदस्यत्व प्राप्त करने बंधनकारक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 27 मे 2020 पर्यन्त आमदारकी मिळविणे बंधनकारक असून अन्यथा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. राज्यात एप्रिल महिन्यात विधान परिषदेच्या 9 जागा  रिक्त  झाल्या. या निवडणुकीत विधान परिषदेवर निवडून जाण्याचा मार्ग महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निश्चित केला. परन्तु राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील 9 जागेच्या निवडणुका  पुढे ढकलल्याने महाविकास आघाडीच्या योजनेवार पाणी फेरले. त्यामुळे मुख्यमंत्री पद टिकविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कोट्यातील राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या  जागेवर उद्धव ठाकरे यांची  नियुक्ती करण्याची शिफारस राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केली. मात्र या प्रस्ताववार राज्यपालांनी महाधिवक्त्यांकडून नियमांची बाजु समझूंन घेतली. यामुळे या प्रस्ताववार मंजूरी देण्यासाठी उशीर होत असल्याच्या वावडया राजकीय वर्तुळात उठु लागल्या.यावर राज्यातील सरकार आणि विरोधी पक्षात वाद विवाद सुरु असतांनाच गुरुवारी राज्यपाल कोश्यारी यांनी ईसीला विनंती केली आहे.राज्यातील विधान परिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी निवडणुका जाहीर कराव्या म्हणून विनंती पत्र पाठविले आहे.
              सोबत राज्यातील राजकीय अस्थिरतेची परिस्थिती निवडणूक आयोगाच्या निदर्शनात आणून देत ही अस्थिरता  अनिश्चितता संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी निवडणूक आयोगाला 24 एप्रिलपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदातील 9 जागा भरण्याची विनंती केली असल्याचे राजभवनातून सांगण्यात आले आहे.
 
राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पाठविलेल्या पत्रात  असे म्हटले आहे की, केंद्र सरकारने देशात लॉकडाउनच्या अंमलबजावणीसंदर्भात अनेक शिथिल उपायांची घोषणा केली आहे. परिषदेच्या जागांवर निवडणुका काही विशिष्ट मार्गदर्शक सूचनांसह पुढे ढकलल्या आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना 27 मे 2020 पूर्वी परिषदेवर निवड होणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
       राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या या भूमिकेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे. मात्र मंत्रीमंडळाने शिफारस केलेल्या प्रस्ताववार कुठलाही निर्णय जाहिर न करता पुढे ढकललेल्या 9 रिक्त जागेसाठी निवडणूक जाहिर करण्याची विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाला केली. यावर सत्ताधारी महाविकास आघाडीच्या शिवसेना,कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस  पक्षाची काय नेमकी भूमिका घेणार आहे ? हे पाहणे महत्वाचे असून कोरोनाचे संकट ओढवलेल्या परिस्थितीत राज्यातील राजकीय परिस्थिती आणखी तापनार असल्याचे संकेत मिळत आहे.