सावधान ;राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १० हजारच्या जवळ पोहचली.

महाराष्ट्र
 29 Apr 2020  324

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ९९२० वर 

* आज नव्या ५९७ रुग्णांची भर 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 29 एप्रिल 

राज्यात बुधवारी तब्बल कोरोनाबाधीत ५९७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.,राज्यातील रूग्णांचा आकडा आता ९ हजार ९२० वर पोहचला. असून लवकरच १० हजाराची संख्या महाराष्ट्र पार करणार आहे. राज्यासाठी ही गंभीर बाब असून मुंबईतील कोरोनाबाधीतांची संख्या ६ हजार ६४४ एवढी झाली आहे. तर आज राज्यात एकूण ३२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २०५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १५९३ रुग्ण बरे झाले आहेत.तर एकूण ७८९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ३७  हजार १५९ नमुन्यांपैकी  १ लाख २६ हजार ३७६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर  ९९१५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६२ हजार ८६० लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १० हजार ८१० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.आज राज्यात ३२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ४३२ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे २६, तर पुणे शहरातील ३ आहेत.  या शिवाय सोलापूर शहरात १, औरंगाबाद शहरात १ आणि पनवेल शहरात १ मृत्यू झाला आहे.आज झालेल्या मृत्यूंपैकी २५ पुरुष तर ७ महिला आहेत. आज झालेल्या ३२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १७ रुग्ण आहेत तर १५  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत.  या ३२ रुग्णांपैकी १८ जणांमध्ये (५६ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ७२३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ९८११  सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ४०.४३ लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ६६४४ (२७०)

ठाणे: ४६ (२)

ठाणे मनपा: ३७३ (४)

नवी मुंबई मनपा: १६२ (३)

कल्याण डोंबिवली मनपा: १५८ (३)

उल्हासनगर मनपा: ८

भिवंडी निजामपूर मनपा: १५

मीरा भाईंदर मनपा: १२५ (२)

पालघर: ४१ (१)

वसई विरार मनपा: १२८ (३)

रायगड: २३

पनवेल मनपा: ४६ (२)

ठाणे मंडळ एकूण: ७७६९ (२९०)

नाशिक: ५

नाशिक मनपा: १९

मालेगाव मनपा:  १७१ (१२)

अहमदनगर: २६ (२)

अहमदनगर मनपा: १६

धुळे: ८(२)

धुळे मनपा: १७ (१)

जळगाव: ३० (८)

जळगाव मनपा: १० (१)

नंदूरबार: ११ (१)

नाशिक मंडळ एकूण: ३१३ (२७)

पुणे:५८ (३)

पुणे मनपा: १०६२ (७९)

पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)

सोलापूर: ७

सोलापूर मनपा: ७८ (६)

सातारा: ३२ (२)

पुणे मंडळ एकूण: १३०९ (९३)

कोल्हापूर: ७

कोल्हापूर मनपा: ५

सांगली: २८

सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)

सिंधुदुर्ग: २

रत्नागिरी: ८ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ५१ (२)

औरंगाबाद:२

औरंगाबाद मनपा: १०३ (७६)

जालना: २

हिंगोली: १५

परभणी: ०

परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: १२३ (७)

लातूर: १२ (१)

लातूर मनपा: ०

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: ०

नांदेड मनपा: ३

लातूर मंडळ एकूण: १९ (१)

अकोला: १२ (१)

अकोला मनपा: २७

अमरावती: २

अमरावती मनपा: २६ (७)

यवतमाळ: ७९

बुलढाणा: २१ (१)

वाशिम: २

अकोला मंडळ एकूण: १६९ (९)

नागपूर: ६

नागपूर मनपा: १३२ (१)

वर्धा: ०

भंडारा: १

गोंदिया: १

चंद्रपूर: ०

चंद्रपूर मनपा: २

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: १४२ (१)

इतर राज्ये: २५ (२)

एकूण: ९९१५  (४३२)