उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद राहणार शाबूत

महाराष्ट्र
 09 Apr 2020  351

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची राज्यपाल नियुक्त जागेसाठी शिफारस

* उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीची शिफारस

* कोरोनामुळे विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलल्याने वाढला होता पेच

लोकदूत वेबटीम 

मुंबई 9 एप्रिल

कोरोनामुळे एप्रिल महिन्यात पुढे ढकलण्यात आलेल्या विधान परिषद निवडणुकामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदस्यत्व मिळविण्यात अड़चन निर्माण झाली होती. मात्र यावर उपाय म्हणून राज्यपाल नियुक्त एका जागेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली.
देशासह राज्यात कोरोनाचे संकट वाढल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने संसदेसह राज्यातील विधान परिषदेच्या होणाऱ्या सर्व निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. घटनेनुसार विधान परिषद अथवा विधानसभा सदस्यत्व नसतांना मंत्री अथवा मुख्यमंत्र्यांना शपथ घेतल्या नंतर 6 महिन्याच्या आत एका सभागृहाचे सदस्यत्व मिळविणे बंधन आहे. अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर कुठल्याही सभगृहाचे सदस्य नसलेल्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची 28 नोव्हेम्बर 2019 रोजी शपथ घेतली होती.त्यामुळे त्यांना 28 मे 2020 पर्यंत विधान परिषद अथवा विधान सभेचे सदस्यत्व प्राप्त करणे बंधनकारक आहे. राज्यातील विधान परिषदेच्या 9 जागेसाठी एप्रिल महिन्यात निवडणूक होऊ घातली होती. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक जागांवर निवडून आणण्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निश्चित केले होते. मात्र कोरोनामुळे येऊ घातलेल्या सर्व निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना दोन्ही पैकी एका सभागृहाचे सदस्यत्व मिळविण्यात अडचन निर्माण झाल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल अशी चर्चा सुरु झाली होती. परंतु एप्रिल महिन्याखेर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या दोन राज्यपाल नियुक्त जागा रिक्त होत आहे. त्यातील एक जागा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी देण्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने निर्णय घेतला. त्यामुळे गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यपाल नियुक्त जागेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकारपुढे निर्माण झालेल्या पेच सुटला आहे.