मध्य रात्री पासून देशात २१ दिवसांचा ल़ॉकडाऊनः पंतप्रधान

महाराष्ट्र
 24 Mar 2020  405

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा 

* आजपासून 14 एप्रिल पर्यन्त राहनार लॉकडाऊन 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 24 मार्च 

एक दिवसाच्या जनता कर्फ्यूला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानत  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री मध्य रात्री पासून 21 दिवसांचा देश लॉक डाऊन  करत असल्याची घोषणा केली. त्यामुळे आता कुणालाही 21 दिवस घराबाहेर पडू शकणार नाही. याशिवाय दूसरा मार्ग उपलब्ध नसून लॉक डाऊन हाच उत्तम पर्याय असल्याचे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या संबोधनातील काही मुद्दे खालील प्रमाणे 

 

जगभरातील बलवान देश या महामारीमुळे हताश झाले आहेत. या देशाकडे कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. परंतु त्यांची तयारी आणि प्रयत्नानंतरही या देशांत आव्हान कायम आहे. अशा सर्व देशातील परिस्थितीचा दोन महिन्यातील घडामोडीचा अभ्यास केला असता असे दिसते की या महामारीवर मात करण्यासाठी आपल्या घरा बंद राहावे. या शिवाय दुसरा पर्याय नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांच्या संक्रमणाला तोडणे गरजेचे आहे. सामाजिक अंतर ठेवण्याची गरज आहे. सोशल डिस्टंगिक सर्वांसाठी आहे. परिवारातील सर्व सदस्यांसाठी आहे. काही लोकांच्या चुकीच्या वागणुकीमुळे आपल्याला किंवा आपल्या मुलांना, मित्रांना परिवारासह संपूर्ण देशाला मोठ्या संकटात टाकू शकते. ही बेपर्वाही सुरू राहील्यास भारताला याची मोठी किंमत मोजावी लागेल. याची किमंत किती मोजावी लागेल, याचा अंदाज बांधणे कठिण जाणार आहे.

मागील दोन दिवसांपासून विविध राज्यात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. राज्य सरकारच्या आदेशाचे कडेकोड पालन करण्याची गरज आहे. आरोग्य विभागाच्या सूचनांचे सर्वांनी पालन करण्याची गरज आहे. या अनुषंगाने आज रात्री बारा वाजल्यापासून संचारबंदी जारी करण्यात येत आहे. संपूर्ण देशाला वाचवण्यासाठी संपूर्ण देशात ल़ॉकडाऊन करण्यात येत आहे. रात्री बारानंतर घरातून बाहेर पडण्यावर बंदी घालण्यात येत आहे.

प्रत्येक घर, गल्ली, मोहल्ला बंद करण्यात येत आहे. जनता कर्फ्यूपक्षा हा निर्णय महत्वपूर्ण आहे. या लॉकडाऊनमुळे देशाला आर्थिक फटका बसणार आहे. परंतु प्रत्येक भारतीयांना वाचविणे हे सरकारचे प्राधान्य आहे. ही माझी आणि भारत सरकारची, राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे या संकटाच्या प्रसंगी जिथे असाल तिथे रहा. सद्यस्थिती पाहता देशात लॉकडाऊन २१ दिवसांचा असेल.

पुढील २१ दिवस महत्वाचे आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी २१ दिवस महत्वाचे आहेत. हे २१ दिवसांत आपण सावरलो नाही तर आपण २१ दिवस मागे जाण्याची शक्यता आहे. एक पंतप्रधान म्हणून नव्हे तर तुमच्या कुटुंबाचा सदस्य म्हणून हे आवाहन करत आहे.

 

पोलिस डॉटर,नर्सेस,वॉर्ड बॉय,रुग्ण वाहिका चालक,ही लोक जीवाची पर्वा न करता तुमचा जिव वाचवत आहे.

1 लाख रुग्ण संख्या होण्यास 67 दिवस लागले, तर पुढचे 1 लाख रुग्ण संक्रमण होण्यास 11 दिवस लागले. पुढच्य केवळ 4 दिवसात 3 लाख संख्या गाठली आहे.

जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे.त्याला प्राथमिकता द्यावीच लागणार आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहणार 

कोरोनाशी लढण्यासाठी जवळपास 15 हजार कोटी खर्च केले जाणार आहे.

राज्य सरकार यांनी पहिली प्राथमिकता हेल्थ केअर हेच असले पाहिजे.

खाजगी लॅब हॉस्पिटल सरकार सोबत काम करायला येत आहे.

काही ठिकाणी अफवा पसरत आहे.परंतु यापासून वाचून रहा.सरकारी यंत्रणानी दिलेल्या सूचनांचे पालन करा.