"महाराष्ट्र लॉकडाऊन"राज्यात 31 मार्च पर्यन्त 144 कलम lलागु

महाराष्ट्र
 22 Mar 2020  506

* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा 

* कधीही न थांबणारी मुंबई थांबणार 31 मार्च पर्यन्त 

* संपूर्ण रेल्वे वाहतूकही बंद 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 22 मार्च 

       जगभर हौदोस  घालत असलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कंबर कसली आहे. रेल्वे विभागाने संपूर्ण रेल्वे वाहतूक 31 मार्च पर्यन्त बंद ठेवली असून यामुळे कधीही न थांबणारी मायानगरी आज मध्यरात्री पासून थांबणार आहे. पंतप्रधानांच्या जनता कर्फ्यूला मिळालेला प्रतिसाद पाहता, राज्यात मध्य रात्रीपासून सर्वत्र 144 कलम लागु करण्यात येत असल्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यामुळे सम्पूर्ण राज्यच बंद राहणार असून केवळ अत्यावश्यक सेवा आणि शहरअंतर्गत वाहतूक सुरु राहणार असल्याचे सांगत 5 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र फिरू नए असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेaआहे.

       देशात 300पेक्षा अधिक तर राज्यात 75पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहे. स्पेन,इटली,जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया ज्या पद्धतीने हौदोस घालून परिस्थिती गंभीर झाली. ती पाहता राज्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी संपूर्ण राज्यात 31मार्च पर्यंत 144 कलम लागु करण्यात येत असल्याची घोषणा केली.प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या अधिक वाढत असून ती रोखण्यासाठी नाइलाजाने हा निर्णय घेत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. भाजीपाला,वीजपुरवठा कार्यालय,बैंक,रुग्णालये,अन्न धन्य दुकान हेच सुरु राहणार आहे. 31 मार्च हा  पहिला टप्पा असून परिस्थिती हातात राहिली तर ठीक अन्यथा 31 मार्च नंतरही हाच निर्णय लागु करावा लागेल असा इशाराही यावेळी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील काही मुद्दे...

 

*आज मध्यरात्रीपासून राज्यात १४४* *कलम लागू*


आपण आता अधिक पुढची पावले टाकत आहोत. सर्वात कठीण काळ आता सुरु झालं आहे.

 जी जिद्द आज आपण दाखविली आहे ती पुढे पण दाखवा. ही आपली खरी परीक्षा आहे. सरकार गंभीर आहे. आपणही सहकार्य करा. 

महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत आहे. ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नका. 

रेल्वे, खासगी बसेस , एस टी बसेस बंद करीत आहोत.

जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील 

अन्न धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने सुरूच राहतील

बँका, वित्तीय संस्था सुरूच राहतील 

शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील.  

आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून येणारी विमाने बंद करीत आहोत. 

ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहेत त्यांच्या हातावर शिक्के आहेत. अशांनी कृपा करून १५ दिवस घराबाहेर पडू नका. आणि घरातल्या घरात सुद्धा वेगळे रहा. 

चाचणी केंद्रे आपण वाढवीत आहोत. 

३१ मार्चच्या पुढे देखील गरज पडली तर निर्णय घेण्यात येईल

सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा अर्चा सुरु राहील पण भाविकांसाठी बंद 

अमेरिकेतल्या ट्रम्पपासून ते आपल्याकडच्या सरपंचांपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी अशी परिस्थिती 

पण माणुसकी बाळगा. कामगार-तात्पुरत्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या