सॅनिटाईझर चा काळा बाजार,आयुर्वेदच्या नावाखाली बोगस सॅनिटाईझर

महाराष्ट्र
 17 Mar 2020  370

कोरोनामुळे बोगस सॅनिटाईझर बाजारात 

* लोकदूत वेबटीम कडून माहिती देताच  fda  ची धड़क कारवाई 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 17 मार्च 

जगभरात भूमाकुळ घातलेल्या कोरोना वायरसने देशसह राज्यातही हातपाय पसरवले आहे. यामुळे लोकांमधील अपूर्ण माहिती आणि त्यांच्या मनातील भीतीचा गैरफायदा घेण्यासाठी काही बोगस फार्मा कंपन्यांनी आयुर्वेदिक च्या नावाखाली बनावट सॅनिटाईझर बाजारात आणले आहे. मात्र सदर बाब लक्षात आणून देताच  ठाणे fda कार्यालय आणि fda मंत्री कार्यालयातून सूत्र हालतच धड़क कारवाई सुरु झाली आहे.

         ग्रीन गैलक्सी नामक फार्मा कंपनी शाहपुर जि ठाणे येथे प्रोडक्शन केलेले हर्बल हैंड सॅनिटाईझर कल्याण येथील काही मेडिकल मध्ये विक्री केले जात होते. यासंदर्भात माहिती मिळताच लोकदूत वेबटीम ने fda मंत्री कार्यालयात याबाबत चौकशी केली. यासंदर्भात माहिती घेता, सदर सॅनिटाईझर बनावट असून त्यात कुठेही हर्बल प्रोडक्ट नसल्याचे लक्षात आहे. त्यामुळे मंत्री कार्यालयातून तत्काळ  ठाणे fad ला आदेश देवून कारवाई  करायला सांगितले. 

       कोरोनामुळे लोकांच्या भीतीचा फायदा घेवून काही मेडिकल स्टोअर्स आणि फार्मा कंपनी बनावट सॅनिटाईझर बाजारात विक्री करत  आहे. मात्र यावर fda ने कडक कारवाई करण्यासाठी पाऊले उचलली असून काल औरंगाबाद येथे काही फार्मा कंपन्यांवर कारवाई केली असता लाखो रुपयांचे बनावट सॅनिटाईझर जप्त केले आहे.