माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या योजनेच्या चौकशीचे आदेश

महाराष्ट्र
 19 Feb 2020  485

माजी वनमंत्री मुंगटीवार यांच्या महत्वाकांक्षी योजनेच्या चौकशीचे आदेश 

* वनमंत्री संजय राठोड यांचे आदेश 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 19 फेब्रुवारी 

 

"एकच लक्ष तेहत्तीस कोटी वृक्ष" ही योजना राबवून राज्य हिरवेगार आणि निसर्ग संपन्न करण्याचे प्रामाणिक उद्दिष्ट राज्याचे माजी  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यानी ठेवले होते. त्यानुसार त्यांनी योजनाही राबविली असताना मात्र विद्यमान वनमंत्री संजय राठोड यांनी या योजनेतील अनियमिततेच्या चौकशीचे आदेश वन विभागाचे प्रधान सचिव व्ही बी रेड्डी यांना दिले आहे.

          राज्यात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यानी वृक्ष लागवड योजना राबविली. मात्र राज्यातील काही ठिकाणी या वृक्ष लागवडीत अनियमित्ता झाल्याच्या काही आमदारांनी तक्रारी केल्या होत्या. शिवाय राज्याचे मदत व पुनर्वसन  मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही त्यांच्या मतदार संघात झालेल्या वृक्ष लागवडीत मोठी अनियमित्ता झाल्याची तक्रार वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे केली होती.त्यामुळे ना. राठोड यांनी ज्या ज्या भागात या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहे. त्या त्या ठिकाणी राबविण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची चौकशी करा असे आदेश वन विभागाचे प्रधान सचिव व्ही बी रेड्डी यांना वनमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे या आदेशावरुण भविष्यत चांगलेच राजकारण तापन्याची शक्यता वर्तवली जात आहे.