भीमा-कोरेगाव प्रकरणी राज्य सरकार करणार चौकशी

महाराष्ट्र
 18 Feb 2020  306

राज्य सरकार करणार भीमा-कोरेगाव प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी

* राष्ट्रवादी कॉंग्रेस मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय 

लोकदूत वेबन्यूज 

मुंबई 17 फेब्रुवारी 

महाविकास आघाडीचे जनक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्याच्या बैठकीत सोमवारी सविस्तर चर्चा केली आहे. यात भीमा कोरेगाव प्रकरणी एनआयए च्या कलम दहा नुसार राज्य सरकारला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे कोरेगाव-भीमा प्रकरणाची चौकशी केंद्र सरकारने आपल्या अंतर्गत  घेतली असली तरी राज्य सरकारही  या प्रकरणी  चौकशी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

 

         राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांना याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या असून लवकरच शरद पवार यांनी मागणी केल्याप्रमाणे राज्य सरकार एसआयटी ची स्थापना करुण सखोल  चौकशी ला सुरुवात करणार  असे ना.मलिक यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात काही बाबी  नव्याने पुढे  येत असल्याने याची चौकशीची नितांत आवश्यकता आहे. काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने तपासल्या असल्याने अनेकावर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या परिस्थितीत राज्य सरकारला स्वतंत्रपणे चौकशी करण्याचे अधिकार अबाधित असल्याने त्याबाबतची चौकशी केली जाईल असे मंत्री नवाब मलिक यांनी घेतले.