मुख्यमंत्र्यांकडून आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा

महाराष्ट्र
 14 Feb 2020  641

शिर्डी संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी अरुण डोंगरे 

# मुख्यमंत्र्यांनी केल्या ५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ९ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर पुन्हा शुक्रवारी अन्य ५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे. यात नांदेड जिल्हाधिकारी पदी असलेले अरुण डोंगरे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी श्री साईबाबा संस्थान संस्था शिर्डी या पदावर केली आहे. एक महिन्यापूर्वी सोलापूर जिल्हाधिकारी पदावरून बदली होऊन सह व्यवस्थापकीय संचालक महानिर्मिती कंपनी  कल्याण  येथे नियुक्त झालेले राजेंद्र भोसले यांची पुन्हा बदली करून पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती देण्यात आली आहे. 

     नागपूर मनपा आयुक्त पदावरून उचलबांगडी केलेले अभिजित बांगर यांची बदली नागपूर येथे वस्त्रोउद्योग विभागच्या संचालक पदावर नियुक्त केले आहे.  कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त पदी नियुक्ती असलेले गोविंद बोडखे यांची  सह व्यवस्थापकीय संचालक महानिर्मिती कंपनी  कल्याण येथे नियुक्ती केली आहे. नुकत्याच सनदी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या वाशीम जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती केली आहे. 

.