...अन मुंडे समर्थकांची बी 4 वर

महाराष्ट्र
 31 Dec 2019  854

*राज्यभरातून धनंजय मुंडे प्रेमी मुंबईत, सतत दुसऱ्या दिवशीही हार - फुलांची रीघ!*

मुंबई  ३१ 

महा विकास आघाडी सरकारच्या ३६ मंत्र्यांच्या शपथविधिसह मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. त्यात शपथबद्ध झालेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या ब -४ या निवासस्थानी शुभेच्छा व सत्कार करणाऱ्या समर्थकांची गर्दी २४ तास उलटूनही कायम राहिली. फुले व पुष्पगुच्छ यांची अक्षरशः रीघ लागलेली आजही पाहायला मिळाली. 

२४ वर्षांच्या संघर्षमय राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री विराजमान झालेल्या मुंडेंचा परळी मतदारसंघसह राज्यात मोठा चाहता वर्ग आहे. शपथविधीच्या वेळीही मुंडेंच्या बंगल्यावर १० हजारच्या घरात गर्दी जमली होती. मर्यादित प्रवेशिका असल्यामुळे अनेकांना टीव्ही स्क्रिनवर शपथविधी पहावा लागला. परंतु तासनतास ही गर्दी कायम असून वरचेवर वाढतच चालली आहे. बीड जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागातून अपल्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी मुंडेंचे समर्थक मुंबईत दाखल होत आहेत. पुष्पगुच्छ, हार - फेटे देऊन व पेढे भरवून शुभेच्छा - सत्काराचे सत्र सतत दोन दिवस सुरूच आहे. त्यामुळे ब - ४ या मंत्रालयासमोरील मुंडे यांच्या निवासस्थानी प्रचंड गर्दी व फुलांची रीघ पाहायला मिळत आहे. 

अनेक कारणांनी राज्यभर गाजलेल्या परळी मतदारसंघातून विक्रमी मतांनी निवडून आलेले आ. धनंजय मुंडे पहिल्यांदाच विधानसभेत आले आहेत. त्यांनतर हिवाळी अधिवेशनात पहिल्याच भाषणात त्यांनी विरोधीपक्षनेते पदी असताना केलेल्या कामगिरीची आठवण करून देणारे धडाकेबाज भाषण केले होते. दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पक्षवाढी साठी अत्यंत कठीण काळातही एकनिष्ठ राहून महत्वाची भूमीका निभावलेल्या मुंडेंची मंत्रिमंडळात वर्णी लागणार हे निश्चित मानले जात होते; आणि अगदी तसेच घडले! विस्ताराच्या वेळी चौथ्या क्रमांकावर शपथग्रहण करताच मुंडे यांच्या समर्थकांनी परळी, बीडसह राज्यभरात जल्लोष केला. तसेच श्री. मुंडे यांना भेटून शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून त्यांचे समर्थक मुंबईत दाखल होत आहेत; कितीही व्यस्त असले तरीही आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मुंडे भेट देतात, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे! त्यामुळे सकाळी ६ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत सत्कार व शुभेच्छांचे सत्र व फुल - हारांची मोठी रीघ हे चित्र पहावयास मिळत आहे.