सरकारने आता गांभीर्याने दुष्काळाचा मुद्दा हाताळावा-शरद पवार

महाराष्ट्र
 13 May 2019  370

दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. आम्ही या सर्व गोष्टींचा आढावा घेतला आणि परिस्थिती मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. सरकारने आता गांभीर्याने दुष्काळाचा मुद्दा हाताळावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

दुष्काळाच्या मुद्द्यावर आणि ईव्हीएम मशीनबाबत शरद पवार यांनी सातारा येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आपले मत व्यक्त केले आहे


दुष्काळाच्या मुद्द्यावर आम्ही कोणतेही राजकारण करत नाही. प्रश्न सरकारला लक्ष्य करण्याचाही नाही,प्रश्न माझ्या शेतकऱ्यांचा आहे. आमची सुरुवातच शेतकऱ्यांपासून  झाली आहे. संकटसमयी त्यांच्या बांधावर जाऊन त्यांची विचारपूस केली नाही तर आमच्यासारखे नतद्रष्ट दुसरे कोणी ठरणार नाही असेही शरद पवार म्हणाले. 


सगळ्याच मशीनमध्ये असे असेल असे मला वाटत नाही मात्र मी हे पाहिलेलं आहे म्हणून काळजी व्यक्त केली. यासाठी आम्ही न्यायालयात गेलो, मात्र दुर्दैवाने न्यायालयाने आमचे म्हणणे ऐकले नाही अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली. 


निवडणुकीच्या काळात ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. गुजरात व हैदराबाद येथील काही ईव्हीएम मशिन्सची तपासणी केली असता घड्याळाचं बटन दाबलं तर कमळाला मत गेल्याचे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलंय, त्यामुळे ईव्हीएम मशीन्सबाबत मला चिंता वाटते असा संशयही शरद पवार यांनी व्यक्त केला.