जनतेसाठी काय करणार कॉंग्रेस राष्ट्रवादी ? वाचा जाहीरनामा जाहीरनामा

महाराष्ट्र
 07 Oct 2019  307

राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तर बेरोजगारांना दरमाह 5 हजार रु. भत्ता 

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई 7 ऑक्टोबर 

 

युती सरकारच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांची मोठी अवहेलना झाली आहे. परंतु कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्रपक्षाला राज्यातील जनतेने कौल दिल्यास, पहिल्या चार महिन्यात शेतकऱ्यांना सरकट कर्जमाफी आणि  बेरोजगार तरुणांना दरमाह 5 हजार रुपये भत्ता दिला जाणार असल्याचे आश्वासन कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस ने आपल्या शपथनामा या जाहिरनाम्यात दिले आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संयुक्त पुरोगामी महाआघाडीचा विधानसभा निवडणुकीसाठी शपथनामा जाहिर केला. यावेळी राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

   यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्यात केजी तो पीजी पर्यंत शिक्षण मोफत देवून उच्च शिक्षणासाठी व्याज मुक्त शैक्षणिक कर्ज दिले जाणार असल्याचे सांगितले. शिवाय ज्या प्रमाणे कामगार न्यायालय आणि मॅट न्यायालय आहे. त्याच धरतीवर शेतकऱ्यांच्या शेतीविषयक,खते,बियाने,हमीभाव, आदि विविध विषयांच्या तक्रारी करण्यासाठी स्वतंत्र न्यायालय निर्माण केले जाणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले. 

        भाजप -शिवसेना युतीच्या पाच वर्षाच्या सत्तेत महाराष्ट्राची आर्थिक अधोगती झाली असून राज्याची स्थिती चिंताजनक बनल्याचे लेखोजोखा महाआघाडीने जाहिरनाम्यात मांडला आहे.  काॅग्रेस राष्ट्रवादी काॅग्रेस आघाडीच्या सरकारशी तुलना करताना मागील पाच वर्षातील वित्तीय स्थिती खालावली आहे. असे स्पष्ट करताना माजी अर्थमंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आकडेवारी सादर केली. 

आघाडी सरकाच्या काळात आर्थव्यस्थेचा वृध्दीदर 13 टक्के होता तो घसरून 10.4 टक्के झाला आहे. सरकारने 32 हजार रोजगार भरतीची घोषणा केली मात्र त्यासाठी 32 लाख बेरोजगारांनी अर्ज दाखल केले. यावरून राज्यातील बेरोजगारीनं उच्चांक गाठल्याचे जयंत पाटील व बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. 

आघाडी सरकारच्या काळात राज्याची महसुली दरवाढ 18 टक्के होती. त्यामधे युती सरकारच्या काळात 11 टक्के इतकी घसरण झाली आहे.  आघाडी सरकारच्या काळात कर उत्पन्न 19.5 टक्के इतका होता. तो मागील पाच वर्षात कर वसुली 8.25 टक्के इतका खाली आल्याचे जयंत पाटील म्हणाले. तर राज्यातील महिला बचत गटांना सरकारकडून 2 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय उपलब्ध करुण देणार असल्याचे यावेळी जाहिर केले. कंत्राटी कामगारांना नियमित करण्यासाठी नवा कायदा करण्यात येईल असे आश्वासन दिले.

......... .................. 

काॅग्रेस-राष्ट्रवादीचा शपथनामा मधील ठळक घोषणा 

- शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देणार 

- तरूण सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा पाच हजार रूपये भत्ता 

- उच्च शिक्षणासाठी शुन्य टक्के व्याजदराने कर्ज 

- कामगारांना किमान 21 हजार वेतन 

- सर्व महानगरपालिकांच्या हद्दीतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घराचा मालमत्ता कर माफ करणार 

- नव्या उद्योगात 80 टक्के नोकर्या स्थानिकांना 

- ठिबक व तुषार सिंचनासाठी 100 टक्के अनुदान 

- महिला गृह उद्योगाच्या विक्री उत्पादनाला जीएसटी पुर्णपणे माफ करणार 

- दिव्यांगाना बीपीएल च्या सवलती देणार

- सिंचनासाठी 100 टक्के अनुदान 

_ औद्योगिक विजेचा दर समांतर करणार 

- नविन मोटार कायदयात  बदल करणार 

_. जातपडताळणी प्रक्रियेत सुधारना 

_ शाळा,रुग्णालय, रेल्वेस्थानक व बसस्थानक येथे मोफत वायफाय 

- जेष्ठ नागरिकांना 1500रुपये पेंशन