कॉंग्रेसकडून सोनिया गांधी मनमोहन सिंग यांच्यासह 40 स्टार प्रचारक

महाराष्ट्र
 04 Oct 2019  213

विधानसभेच्या प्रचारासाठी कॉंग्रेसकडून 40 स्टार प्रचारक रिंगणात 

* सोनिया गांधी,मनमोहन सिंग, राहुल गांधी यांचा समावेश

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई 4 ऑक्टोबर 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पाठोपाठ कॉंग्रेस पक्षानेही आपल्या 40 स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे दिली आहे. यात कॉंग्रेसच्या राष्ट्रिय हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंग,मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत,उपमुख्यमंत्री सचिन पायलट अशोक चव्हाण, यशोमती ठाकुर, विजय वडेट्टीवार, सचिन सावंत यांच्यासह 40 नेत्यांच्या नावाचा समावेश आहे.