अररर... मातोश्रीतुन मराठीत नव्हे चक्क गुजरातीत मतदारांना हाक

महाराष्ट्र
 02 Oct 2019  222

सत्तेसाठी शिवसेनेला मराठी बाणाचा विसर

* चक्क गुजरातीत "केम छो वरली"चा जागर 

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई 2 ऑक्टोबर 

राज्यात ज्या शिवसेनेने मराठी माणसांसाठी मुंबईत राजकरण करीत आपले अस्तित्व निर्माण केले. त्याला आता धक्का लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. एरवी मराठी माणसाला केंद्र स्थानी ठेवून ज्या मातोश्रीवर पक्षाची धोरणे आखाली जात होती. त्या मतोश्रीवरुन आता चक्क गुजरातीतून आवाज यायला सुरुवात झाली आहे. युवराज आदित्य ठाकरे वरळी येथून निवडणूक लढविणार असल्याने सेनेकडून चक्क "केम छो वरली" असे गुजरातीत फलक झळकायला सुरुवात झाली.त्यामुळे मराठी बाणा सोडून गुजराती मध्ये हाक देणाऱ्या मातोश्रीने  सत्तेसाठी लोटांगण घातले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात  पसरली आहे.

     ठाकरे घराण्याचा आवाज हा मराठीतूनच तमाम शिवसैनिकांच्या कानावर ऐकायला येत होता. मात्र गेल्या पाच वर्षात शिवसेनेने सत्तेसाठी अनेकदा लोटांगण घातले आहे. मराठी माणसांच्या हितासाठी काहीही करू असे धोरण असलेल्या शिवसेनेने युवराज आदित्य ठाकरे यांच्यासाठी चक्क गुजराती धोरणाचा स्विकार केला आहे. शिवसैनिकांना  निवडणुकीच्या रिंगणात उतरुण  म्हणूनच रिंगमास्टर ची भूमिका घेणाऱ्या मतोश्रीने यावेळी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. सत्तेत विराजमान करुण चाबुक आपल्या हातात ठेवण्याची परंपरा असलेल्या  ठाकरे घराण्यातील तिसऱ्या पीढीने स्वतः रिंगणात उडी घेतली आहे. पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जाण्याचा अनुभव येत असल्याने युवराज आदित्य ठाकरे यांनी वरळी भागात मराठीत नव्हे तर गुजराती भाषेत "केम छो वरली" असे फलक झळकावले आहे. या माध्यमातून गुजराती मतांना  आपलेसे करणाऱ्या आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला मराठी बाणाचा विसर पडला आहे. हे सर्व काही सत्तेसाठी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आणि शिवसैनिकात सुरु झाली आहे.