महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहिर

महाराष्ट्र
 21 Sep 2019  556

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जाहीर

* 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान 

* 24 ऑक्टोबर रोजी होणार मतमोजणी 

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई 21 सप्टेंबर 

राज्यातील तमाम जनतेचे ज्या घोषणेकडे लक्ष लागले होते. ती निवडणूक घोषणा आणि आदर्श आचारसंहिता अखेर  भारतीय निवडणूक आयोगाने  शनिवारी दुपारी 12 वाजता लागु केली आहे. राज्यातील विधानसभेची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाचे  मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी केली असून राज्यात एकाच टप्प्यात 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तर 24 ऑक्टोबर  2019 रोजी मतमोजणी होणार असल्याने दिवाळीपूर्वीच राजकीय पक्षांची  दिवाळी साजरी होणार आहे. परंतु सातारा लोकसभा निवडणुकीची पोटनिवडणुक जाहिर न झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

       राज्याच्या विधानसभेचा  कार्यकाळ 9 नोव्हेम्बर 2019 पर्यन्त आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रात नवे सरकार अस्तित्वात येणार असून केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केल्या नुसार राज्यात  27 सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अधिसूचना जाहिर होणार आहे. उमेदवारांना 4 ऑक्टोबर 2019 पर्यन्त उमेदवारी अर्ज दाखल  करता येणार आहे.5 ऑक्टोबर 2019 रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी 7ऑक्टोबर 2019 पर्यन्त मुदत देण्यात आलेली आहे. राजकीय पक्षांना मतदारांसमोर जाण्यासाठी आता फ़क्त 30दिवसच बाकी असल्याने निवडणूक रिंगणार असलेल्या उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे . 

        राज्यात एकूण   एकूण 8 कोटी 94 लाख मतदार विधानसभा निवडणुकीत मतदान करणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी तब्बल 1.8लाख मतदान यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघातील एकूण व्ही व्ही पैड़ पैकी 5 व्ही व्ही पॅड स्लिप प्रत्येक मतदार संघात मोजणी होणार आहे.