मुख्यमंत्र्यांच्या रॅलीवर कड़कनाथ कोंबड्याचे सावट

महाराष्ट्र
 16 Sep 2019  554

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश रॅलीत कड़कनाथ कोंबड्या सोडण्याची पोलिसांना भीती 

* पोलिसांच्या जिल्हा पशुधन अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना 

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई 16 सप्टेंबर 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पलुस कराड या मार्गावर रॅली होणार आहे.या  रॅलीत कड़कनाथ कोंबड्या सोडण्याच्या भीतीने सांगली पोलिसांची भंबेरी उडाली असून पोलिसांनी या कोंबड्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचनाच जिल्हा पशुधन अधिकाऱ्यांना दिल्या आहे. 

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाजनादेश यात्रेचा अंतिम टप्पा पश्चिम महाराष्ट्रातून जात आहे. 16 सप्टेंबर रोजी पलुस कराड मार्गावर रॅलीचे आयोजन केले आहे. सांगली जिल्ह्यात सध्या  कड़कनाथ कोंबड्यांचा घोटाळा जोरात गाजत असल्याने यात उधवस्त झालेले शेतकरी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. त्यामुळेच यांच्याकडून रॅलीमध्ये कड़कनाथ कोंबड्या सोडून मुख्यमंत्र्यांच्या रॅलीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. अशी शक्यता सांगली पोलिसांनी व्यक्त केली आहे. 

   त्यामुळे या रॅलीमध्ये येणाऱ्याकड़े कोंबड्या आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करुण कोंबड्या जप्त करण्याच्या सूचना जिल्हा पशुधन अधिकाऱ्यांना दिल्या आहे.