युतीच्या चर्चेसाठी जे पी नड्डा 9 तारखेला मुंबईत

महाराष्ट्र
 05 Sep 2019  470

युतीच्या चर्चेसाठी भाजप कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा मुंबईत 

* अनंत चतुर्थीआधी होणार युतीचा फैसला 

* मॅरेथॉन बैठका घेणार 

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई 5 सप्टेंबर 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप पक्षांची युती करण्याबाबत  पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा हे मुंबई दौऱ्यावर येत आहे. 9 सप्टेंबर रोजी मुंबईत जे पी नड्डा हे मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका घेणार आहे.

     15 सप्टेंबर च्या आत राज्याच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहिर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत अनंत चतुर्थीच्या आधीच युतीचा तिढा सोडवण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.   या दौऱ्यात नड्डा हे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबतही चर्चा करणार असून या चर्चेचा सर्व लेखाजोखा अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपवाला जाणार आहे. त्याच बरोबर युतीचा निर्णयही अमित शाह हेच घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले