भगत सिंग कोश्यारी होणार राज्याचे राज्यपाल ?

महाराष्ट्र
 31 Aug 2019  610

महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी भगत सिंग कोश्यारी ?

 

लोकदूत वेबन्यूज़ टीम 

मुंबई 31 ऑगस्ट 

 

राज्याचे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांचा कार्यकाल संपुष्टात आला असून महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून भाजपा उत्तराखंडचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री भगत सिंग कोश्यारी यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. लवकरच राष्ट्रपती भवनातून नियुक्ती जाहिर होण्याची शक्यता आहे.

 महाराष्ट्राच्या   राज्यपाल पदाचा कायर्काळ पूर्ण केल्यानंतर विद्यमान राज्यपाल चे. विद्यासागर राव यांना मुदतवाढ दिली जाणार की नव्या राज्यपालांची नियुक्ती केली जाईल यावर चर्चा सुरु होती. परंतु भगत सिंग कोश्यारी यांना राज्याच्या राज्यपाल पदाची सूत्र दिली जाणार असल्याचे सूत्रांनी माहिती दिली आहे. भगत सिंग कोश्यारी यांचा जन्म 17 जून 1942 रोजी झाला असून उत्तराखंड राज्याचे पाहिले भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी  जबाबदारी पार पाडली आहे. 30ऑक्टोबर 2001 ते 1मार्च 2002 या कालावधीत उत्तराखंड राज्याचे दूसरे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते, राज्यसभा खासदार , लोकसभा खासदार म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.