खा. नवनीत राणा यांच्या आरोपात तथ्य नाही.- गृहमंत्री

लोकदूत वेबटीम
मुंबई 26 एप्रिल
खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या तक्रारीसंदर्भात विभागाने चौकशी केली असून त्यामध्ये तथ्य नसल्याचे समोर आले आहे, तरीसुद्धा लोकसभा अध्यक्षांनी त्यांना ही माहिती राज्य सरकार असल्याचे माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बुधवारी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माहिती दिली. पोलिस कायद्यानेच काम करत असून कायद्याच्या बाहेर कोणतेही काम करत नाहीत. मुंबई पोलिस उत्तम काम करत असून कायद्याप्रमाणे त्यांना जे योग्य वाटते, त्यावर ते कार्यवाही करत आहेत. राणा यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
मनसेच्या संभाजीनगर येथील नियोजित सभेबाबत आयुक्त निर्णय घेतील, यावेळी सांगितले. संभाजीनगर येथे मनसेकडून सभा घेण्यात येत आहे. या सभेबाबत तेथील पोलिस आयुक्त एक दोन दिवसात बैठक घेऊन त्यावर निर्णय देतील, यासाठी पोलिस महासंचालकांशीही चर्चा करण्यात येणार आहे. मंगळवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतरही जर कुणाला वेगळी भूमिका घ्यायची असेल, तर त्यावर पोलिस आयुक्त निर्णय घेतील. हा त्यांचा अधिकार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, खासदार राणा यांनी मुंबई पोलिसांवर केलेल्या आरोपांबाबत पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्विटरवरून खुलासा केला आहे. खासदार राणा या ठाण्यात बसून चहा पीत असल्याची चित्रफीत त्यांनी ट्विटरवर प्रसारित केली आहे. या चित्रफितीतून खासदार राणा पोलिसांनी अपमानास्पद दिल्याचे कोठेही स्पष्ट होत नाही.