संजय पांडे मुंबई पोलीस आयुक्तपदी

मुंबई पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती
* हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र सुरक्षा मंडळावर नियुक्ती
लोकदूत वेबटीम
मुंबई 28 फेब्रुवारी
पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोडावे लागलेले जेष्ठ भापोसे अधिकारी संजय पांडे यांची राज्य सरकारने मुंबई पोलीस आयुक्त पदी सोमवारी नियुक्ती केली आहे. पांडे यांची नियुक्ती करण्यासाठी राज्य सरकाराच्या तिन्ही पक्षातील नेत्यांची चर्चा झाली असता, विरोधी पक्षाकडून राज्य सरकार च्या मंत्री आणि विविध नेत्यांविरोधात तक्रारीचा व कारवाईचा पाऊस पडत आहे. त्यामुळे या तक्रारीचा निपटारा करतांना विरोधकांना न जुममाणारे म्हणून संजय पांडे यांचेकडे मुंबई पोलीस आयुक्त पदाची धुरा दिली असल्याची जोरदार चर्चा आहे.