मंत्री नवाब मलिक यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा

लोकदूत वेबटीम
मुंबई 14 ऑक्टोबर
महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मंत्री मलिक यांना धमकीचे फोन येत असल्याने राज्य सरकारने त्यांना वाय प्लस दिली असल्याचे गुरुवारी सांगण्यात आले.
काही दिवसांपासून मंत्री नवाब मलिक यांनी ‘एनसीबी’च्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित करत आहेत. मला धमकीचे फोन येत आहेत. माझ्या जिवाला धोका असल्याचेही अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. माझ्या सुरक्षेत वाढ करून वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याचे ते म्हणाले.
नवाब मलिक यांना त्यांच्या सुरक्षेसाठी पिस्तूलसह सोबत असणारा पोलीस गार्ड होता. वाय प्लस सुरक्षेअंतर्गत त्यांच्या निवासस्थानी पायलट कारसह चार सशस्त्र पोलीस सुरक्षेसाठी तैनात असतील.
--------