28 मुख्याधिकाऱ्यांना वर्ग अ मध्ये पदोन्नती

मंत्रालय
 20 Jan 2021  1228

 

*  नागपूर मनपा उपायुक्तपदी राजेश भगत तर पनवेल मनपात सचिन पवार

 

लोकदूत वेबटीम

मुंबई 20 जानेवारी

राज्याच्या नगरविकास विभागाने राज्यातील मुख्याधिकारी वर्ग 2 संवर्गातील 28 अधिकाऱ्यांना मुख्याधिकारी वर्ग अ या वर्ग एकच्या संवर्गात पदोन्नती केली आहे. यात उमरेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेश भगत यांनी नागपूर मनपा उपायुक्त पदी नियुक्ती केली असून सोलापूर जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे यांची अमरावती मनपा उपायुक्त पदी नियुक्ती केली आहे. 

      औरंगाबाद येथील जिल्हा  प्रशासन अधिकारी सविता खरपे हारडकर यांची सहायक आयुक्त कोकण विभाग, सचिन पवार यांची पनवेल मनपा उपायुक्त या पदावर नियुक्ती केली आहे. हरिकल्याण एलगट्टे यांना उस्मानाबाद नगर परिषद मुख्याधिकारी, दीपक झिंजाळ मुख्याधिकारी तळेगाव येथून उपायुक्त भिवंडी मनपा,दीपक सावंत सहायक आयुक्त भिवंडी मनपा येथून उपायुक्त जळगाव मनपा या पदावर नियुक्ती झाली आहे.पुणे मनपा सहायक आयुक्त तानाजी नरळे यांची उपायुक्त वसई विरार मनपा,गणेश शेटे खपोली नप मुख्याधिकारी येथून उपायुक्त पनवेल मनपा, कैलास गावडे सहायक आयुक्त नप संचालनालय वरळी,अशोक गराटे काटोल नप येथून उपायुक्त चंद्रपूर मनपा,सुषमा शिंदे मुख्याधिकारी वडगाव येथून सहायक आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा,विजयकुमार द्वासे यांची उपायुक्त वसई विरार मनपा या ठिकाणी नियुक्ती केली आहे.शिल्पा दरेकर यांची उपायुक्त कोल्हापूर मनपा,शीला पाटील सहायक आयुक्त नप संचालनालय वरळी,प्रियांका राजपूत यांची सहायक आयुक्त अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय,मयुरा शिंदेकर उपायुक्त मनपा लातूर,नीलम पाटील सहायक आयुक्त, औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालय,चारुशीला पंडित उपयुक्त वसई विरार मनपा, अमित दगडे पाटील मुख्याधिकारी बार्शी नप,व्यंकटेश दुर्वास सहायक आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा,श्याम गोस्वामी उपायुक्त जळगाव मनपा, सावनेर नप मुख्याधिकारी रवींद्र भेलावे यांची उपायुक्त नागपूर मनपा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. रवी पवार यांची अमरावती मनपा उपायुक्त पदी नियुक्ती झाली असून योगेश गोडसे यांची नगरविकास राज्यमंत्री यांचे कार्यालयात प्रपत्र बढती,यशवंत डांगे उपायुक्त अहमदनगर मनपा,पंकज पाटील उपायुक्त वसई विरार मनपा,प्रदीप ठेंगल सहायक आयुक्त पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे नियुक्ती देण्यात आली आहे.