मंत्रालयातील बदल्यांची स्पर्धा अन्य अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचा मृत्यु

मंत्रालय
 07 May 2020  4434

 दबाव आणणारा वजनदार मंत्रीकार्यालयातील तो कोण? 

लोकदूत वेबटीम 
मुंबई 7 मे 

  मंत्रालयातील जीवघेणी बदल्यांची स्पर्धा किती भयानक आहे हे सर्वश्रुत आहे. याच स्पर्धेला तोंड देत असतांना पुणे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड़ यांना आपला जीव गमवावा लागला.    पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर सहा महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या साहेबराव गायकवाड़ यांना त्यांच्यावर येत असलेल्या दबावामुळे ह्रदयविकाराचा झटका आला आणि  गुरुवारी सकाळी निधन झाले आहे. यामागे मंत्रालयातून सुरु असलेली जीवघेण्या बदल्यांची स्पर्धा कारणीभूत असल्याची जोरदार चर्चा सुरु असून मॅटच्या आदेशानुसार आपल्या पदावर पुन्हा रुजू होण्याच्या तयारीत असलेल्या गायकवाड यांना मंत्रालयातील त्या वजनदार मंत्री कार्यालयतून फोन करुण दबाव आणणारा कोण? याबाबत मंत्रालयापासून तर पुणे पर्यंत जोरदार चर्चा रंगली आहे.
         
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील उपजिल्हाधिकारी संवर्गातून अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर 69 अधिकाऱ्यांच्या जानेवारी महिन्यात पदोन्नती आदेश मंत्रालयातून निघाले होते. त्यानंतर पदोन्नती झालेल्या सर्व नवनियुक्त अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना नव्या पदावर नियुक्तीची नस्ती मुख्यमंत्री कार्यालयात गेली. परंतु लॉकडाउन मुळे महीनाभर ही नस्ती मुख्यमंत्री कार्यालयात अडकून पडल्याने मागील आठवड्यात या सर्व अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना नव्या ठिकाणी नियुक्त्या देण्यात आल्या. यात बहुतांश अधिकाऱ्यांनी नव्या नियुक्तीसाठी आपल्या मायबाप असलेल्या विविध आमदार खासदार मंत्री यांच्या माध्यमातून जोरदार फील्डिंग लावत आपल्याला आवश्यक असलेल्या पदावर नियुक्ती मिळवली. यात पुणे येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर गेल्या सहा महिन्यांपूर्वी नियुक्ती झालेल्या साहेबराव गायकवाड़ यांची उचलबांगड़ी करुण नव्याने पदोन्नती झालेल्या विशालसिंग  देशमुख यांनी मंत्रालयातील त्या वजनदार "मंत्री" कार्यालयतून महसूल विभागावार दबाव आणून लॉकडाउन काळात पुणे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळवली. तर साहेबराव गायकवाड़ यांना पुणे जवळच मनपा मध्ये नियुक्ती दिली.
       नियुक्ती झालेल्या देशमुख यांनी लगेच पुणे गाठत अतिरिक्त जिल्हाधिकारी पदाची सूत्र हाती घेतली. मात्र नियमबाह्य पद्धतीने आपली उचलबांगड़ी केल्याने नाराज झालेल्या अतिरिक्त जिल्हाधिकारी असलेल्या साहेबराव गायकवाड़ यांनी मॅट मध्ये जावून आपल्यावर झालेल्या अन्यायची कहानी विशद केली. सरकारी आदेश आणि गायकवाड़ यांचे म्हणणे एकूण घेत मॅट ने शासनाला देशमुख यांची ऑर्डर रद्द करुण साहेबराव गायकवाड़ यांना तात्काळ अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर नियुक्त होण्याचे आदेश बजावले. यामुळे नव्याने सूत्र हाती घेणाऱ्या विशालसिंग  देशमुख यांना पायउतार व्हावे लागणार असल्याने व्यथित झालेल्या मंत्रालयातील त्या वजनदार मंत्री कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी साहेबराव गायकवाड़ यांच्यावर विविध प्रकार दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मॅटच्या आदेशाची अमलबजावणी करुण गुरुवारी पुनः आपल्या मूळ अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर हजर होण्याच्या तयारीत असलेल्या साहेबराव गायकवाड़ यांना त्यांच्या मोबाईलवर मंत्रालयातून त्या मंत्री कार्यालयातून फोन येत असल्याचे पुण्यातील सूत्रांनी सांगितले. अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर हजर होऊनये यासाठी  वारंवार दबाव येत असल्याने साहेबराव गायकवाड़ यांना गुरुवारी सकाळी अचानक ह्रदयविकराचा झटका आला. त्यामुळे त्यांना अपात्कालीन अवस्थेत साहेबराव गायकवाड़ यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्राणज्योत माळवली. यामुळे पुणे विभागासह राज्यातील महसूल विभागात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. सदर बातमी मंत्रालयात कळताच सर्वांनाaआश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे नियामत न बसत असतांनाही मनमानी पद्धतीने त्या मंत्री कार्यालयातून विशा सिंग देशमुख यांची नियुक्ती करण्यासाठी कोण दबाव आनत होते ? कोणी साहेबराव गायकवाड़ यांच्यावर हजर न होण्याचा दबाव आणला? याची चौकशी राज्य सरकार करणार आहे का? साहेबराव गायकवाड़ यांचा फोन तपासून मंत्रालयातून फोन करणारा तो अधिकारी कोण?याचा शोध घेणार का? यावर सर्वत्र चर्चा पसरायला सुरुवात झाली आहे. मंत्रालयात ज्या प्रकारे बदली स्पर्धा रंगतaआहे त्याचे साहेबराव गायकवाड़ बळी ठरले आहे.