अर्जुन रामपालची विभक्त पत्नी पुरवणार 'नवऱ्याच्या बायको'चे डोहाळे

विधिमंडळ
 17 May 2019  579

मुंबई लोकदूत वेबटीम 

बॉलिवूडमधले नातेसंबंध सामान्य माणसांना समजण्यापलिकडचे असतात, असं म्हणतात ते चुकीचं नाही. बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल लवकरच घटस्फोट घेणार आहे. त्याआधीच अर्जुनची प्रेयसी प्रेग्नंट आहे. मात्र अर्जुनची 'दुरावलेली पत्नी' मेहर जेसिया 'नवऱ्याच्या बायको'चे डोहाळे पुरवणार आहे.

हृतिक रोशन-सुजान खान, अरबाज खान-मलायका अरोरा ही दशकभराच्या संसारानंतर विभक्त झालेली नजीकच्या काळातील काही जोडपी. मात्र नात्यात आलेल्या दुराव्यानंतरही त्यांनी मैत्र जपले आहेत. अर्जुन रामपाल-मेहर जेसिया यांच्या रुपाने अशा 'आदर्श विभक्त जोडप्यां'च्या यादीत भरच पडताना दिसत आहे.

अर्जुन आणि मेहर 1998 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. वीस वर्षांच्या संसारानंतर गेल्या वर्षी मे महिन्यात दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांना महिका आणि मायरा या दोन मुली आहेत. अर्जुन-मेहर कायदेशीदृष्ट्या विभक्त झालेले नसले, तरी लवकरच त्यांचा घटस्फोट होणार आहे.