तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या ही राज्यासाठी लज्जास्पद

विधिमंडळ
 07 Mar 2022  402


तरुण शेतक-याची आत्महत्या हे सरकारसाठी लज्जास्पद


* विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर 

लोकदूत वेबटीम 

मुंबई ७ मार्च 

 

 सोलापूरातील मगरवाडी येथे सुरज जाधव नावाच्या एका शेतकऱ्याने चार मार्चला फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली. 'पुन्हा शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणार नाही', असं म्हणत या तरुण शेतकऱ्याने आपलं जीवन संपवलं आहे. ही बाब महाविकास आघाडी सरकारसाठी लज्जास्पद असल्याची टीका करत महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत असंवेदनशील असल्याचा आरोप केला आहे.
    विधानपरिषदेत हा महत्त्वाचा विषय माडंताना दरेकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्येला तोंड द्यावं लागतंय. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जगणं मुश्कील झालं आहे. यातच सूरज जाधव नावाच्या तरुण शेतकऱ्यांने केलेल्या आत्महत्या केली.  शेतकऱ्यांची विज तोडणी करू नये, शेतकरी आत्महत्या करताना सरकार वीज तोडणी करत असून त्यांना अवाजवी वीज बिल पाठवित आहेत, त्यामुळे शेतक-यांची वीज तोडणी थांबवणार नाही तोपर्यंत कामकाज होऊ देणार नाही, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
    सूरज जाधवने आत्महत्येपूर्वी व्हिडिओ केला आहे त्यात त्याने म्हटलंय, मला पुन्हा शेतकरी म्हणून जन्म घ्यायचा नाहीए, कारण शेतकरी हा असमर्थ, दुबळा असतो. या सरकारला शेतकऱ्याची काळजी नाहीए, असं म्हणत त्याने शेतकरी धोरणाचा निषेध केला. आणि त्यानंतर त्याने आत्महत्या केली.  सुरजने वीज तोडणी केल्यामुळे, वीज खंडित केल्यामुळे आत्महत्या केली आहे. आत्महत्येला महाविकास आघाडी सरकारचा  बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे सांगत सरकारवर दरेकर टीकेची झोड उठविली.