अधिवेशनात विरोधकांचा सत्ताधाऱ्यांशी संघर्ष

विधिमंडळ
 03 Mar 2022  1047
लोकदूत वेबटीम 

मुंबई २ मार्च 

 

राज्यातील सां सरकार देशद्रोही दाऊदला समरर्प्रित सरकार असून दाऊद सारख्या देशद्रोह्या सोबत व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांच्या यांच्या पाठीशी मविआ सरकार आहे. त्यामुळे  मालिकांचा राजीनामा घेत पर्यंत   आम्ही सभागृहात संघर्ष करणार असल्याचा इशारा  विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला. त्याच बरोबर  अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित विरोधकांनी बहिष्कार टाकल्याची घोषणा त्यांनी केली.


विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज  गुरुवारपासून मुंबईत सुरु होत आहे. या अधिवेशनाची रणनिती ठरवण्यासाठी  विरोधी पक्षातील घटक पक्षांच्या नेत्यांची  बैठक झाली. या बैठकीनंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने केलेली  अटक, ओबीसी-मराठी आरक्षण,  वाईन विक्रीची परवानगी, शेतकरी कर्जमाफी, वीज कापण्याच्या घटना अशा मुद्यांवर सरकारला घेरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.मुंबई बॉम्ब स्फोटातील व्यक्तीकडून जमीन खरेदी करणे हा गंभीर आरोप असून यातील पैसा दाऊद पर्यंत पोहचला. तरीही सरकार नवाब मलिक याना पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी फडणवीस यांनी करीत,नवाब मलिक यांचा राजीनामा न घेण्यामागे एका विशिष्ट समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न असून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा हा प्रकार आहे. त्यांना वाचविण्याचा प्रकार जर राष्ट्रवादी काँग्रेस करत असेल तर त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा व  चरित्र काय ते दिसून येते. पण जोपर्यंत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही अधिवेशन चालू देणार नाही, असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले. 

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशापासून ते महापालिकेपर्यंत भाजपाने सत्ता भोगायची मग आम्ही काय धुणीभांडी करायची का? असा सवाल केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यांनी काय करायचे हे त्यांनी ठरवावे.पण त्यांच्याकडचे काही जण दाउदकडे धुणी भांडी करतात ते बंद झाले पाहिजे. त्यांनी मी घेतो तशी पत्रकार परिषद घेउन उत्तरे द्यावीत, असे आव्हान फडणवीस यांनी दिले.  

 

वीज जोडणी कापण्याच्या मुद्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. ग्रामीण भागात शेतक-यांच्या वीज पंपाची जोडणी कापण्यात येत आहे. शेतक-यांची वीज कापणार नाही अशी घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी मागील अधिवेशनात केली होती. पण तरीही वीज कापण्याचे प्रकार सुरु आहेत. यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाला किंमत राहिलेली नाही. यानिमित्ताने त्यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावरही शाब्दिक हल्ला केला. राऊत यांची विधाने लक्षात घेतली तर राज्यात लोकशाही आहे अथवा हुकुमशाही आहे असे प्रश्न निर्माण होते.मात्र भाजप शेतक-यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा असल्याचे ते म्हणाले.


मराठा व ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारला जाब विचारण्यात येईल. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपतींच्या घराण्यातील व्यक्तीला आझाद मैदानात उपोषणाला बसावे लागले. उपोषण मागे घेण्यासाठी राज्य सरकारने त्यांना आश्वासन दिले आहे. पण ही आश्वासने पूर्ण होतील अथवा नाही याबाबत शंका असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हवा मे फायर नही करता
अधिवेशनातील रणनितीबाबत बोलताना ते म्हणाले की, या अधिवेशनात गैरव्यवहार व भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करणार आहे. मै हवा मे फायर करनेवाला नही हूँ असे सांगत  या अधिवेशनात आपण काही पुरावे सादर करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.