मुख्यमंत्र्यांसह 12 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल

विधिमंडळ
 11 May 2020  910

*.  राष्ट्रवादी कडून  1 तर भाजप कडून 2 डमी उमेदवारांची उमेदवारी 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 11 मे 

 

विधान परिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवाय यासोबत भाजप पक्षाने रमेश कराड आणि संदीप लेले असे  2 तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने किरण पावस्कर  यांची डमी उमेदवार म्हणून उमेदवारी दाखली केली असून एकूण 12 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.

      मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असता यावेळी त्यांचे सम्पूर्ण कुटुंब उपस्थित होते. तांत्रिक मुद्द्याने कुठल्याही उमेदवारांची उमेदवारी दाखल होऊ नये म्हणून राष्ट्रवादी व भाजप ने डमी उमेदवारांची उमेदवारी दाखल झाल्याने  ९ जागांसाठी 12 अर्ज दाखल झाले. मात्र स्क्रूटनी मध्ये कुठलाही अर्ज बाद न झाल्यास तीन डमी उमेदवार आपली उमेदवारी मागे घेवून  ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

येत्या २१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होणार  असून,उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,नीलम गो-हे,राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे,अमोल मिटकरी, तर काँग्रेसकडून राजेश राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सोबतच डमी उमेदवार म्हणून भाजपचे रमेश कराड आणि संदीप लेले तर राष्ट्रवादी कडून किरण पावस्कर यांनी अर्ज दाखल केले आहे.मुख्यमंत्री ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करताना उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,तेजस ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि मंत्री उपस्थित होते.भाजपने आपल्या चार उमेदवारांचे अर्ज यापूर्वीच भरले आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या डॉ.नीलम गो-हे, भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील,गोपीचंद पडळकर, डॉ. अजित गोपछेडे,प्रवीण दटके आणि काँग्रेसतर्फे राजेश राठोड यांच्या  उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर बिनविरोध निवडीची घोषणा होण्याची शक्यता आहे.