रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सनरायझर्स हैदराबादवर चार विकेट्सनी विजय

विधिमंडळ
 21 May 2019  35

मुंबई लोकदूत वेबटीम 

हेटमायर आणि गुरकीरत मान यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने सनरायझर्स हैदराबादवर चार विकेट्सने विजय मिळवला. या पराभवामुळे हैदराबादला प्ले ऑफचं तिकीट मिळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आता कोलकात्याचा मुंबईविरोधात पराभव झाल्यासच हैदराबादला प्ले ऑफचं तिकीट मिळणार आहे.

आजच्या सामन्यात 176 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर पार्थिव पटेल शून्यावर तर एबी डिव्हिलियर्स अवघी एक धाव काढून बाद झाला.