शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तुम्हचे हात कुणी बांधले ?

विधिमंडळ
 17 Dec 2019  792

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तुमचे हात का बांधले होते? 

* वित्तमंत्री जयंत पाटील यांचा विरोधकांना सवाल 

लोकदूत वेबटीम 

नागपूर 17 डिसेंबर 

हेक्टरी 25 हजार रुपये शेतकऱ्यांना द्या अशी मागणी लावून धरलेल्या विरोधी पक्षावर वित्तमंत्री जयंत पाटील चांगलेच तुटून पडले. ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले तेव्हा आताचे विरोध सरकार मध्ये होते. तेव्हा यांनी का मदत केली नाही ? असा खडा सवाल उपस्थित करून वित्तमंत्री जयंत पाटील यांनी भाजप पक्षावर हल्लाबोल केला. शिवाय राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांसाठी सदैव पुढे राहणार असून शेतकऱ्यांना हे सरकार वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही वित्तमंत्री जयंत पाटील यांनी विरोधकांच्या मागणीवर उत्तर देताना दिली.
विरोधी पक्षांनी लावून धरलेल्या मागणीवर गोंधळ सुरू असताना वित्तमंत्री जयंत पाटील यांनी सरकारची भूमिका मांडली. राज्य सरकार शेतकऱ्यांना काय काय मदत करण्यासाठी पाऊले उचलत आहे. याची माहिती देण्यासाठी राज्य सरकार तयार असतांना ती देऊन न देण्यासाठी विरोधी पक्ष गोंधळ घालत असल्याचा सनसनाटी आरोपही विरोधी पक्षावर केला.राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत सहा हजार सहाशे कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी दिले असून त्यातील 2100 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहे.शिवाय संपूर्ण मदत करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे 14600 कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात मागणी करण्यासाठी आम्हच्या सोबत यावे. असे आव्हान देत आताच आक्रमक होण्याची आवश्यकता नसून पुढील पाच वर्षे विरोधी पक्षात बसूनच काम करावे लागणार असल्याचा टोलाही लगावला.सत्तेत असताना राज्यातील शेतकऱ्यांची चिंता केली नसल्यानेच हे तुमचे पाहिले पाप असल्याची टीका करीत शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार ताकदीने काम करणार असल्याची ग्वाहीही सभागृहात यावेळी वित्तमंत्र्यांनी दिली.