अक्षय कुमार कॅनडाला स्थाईक होणार

विधिमंडळ
 15 May 2019  30

मुंबई लोकदूत वेबटीम 

पंतप्रधान नरेंद्र मोदींची अराजकीय मुलाखत घेणारा बॉलिवूडचा 'खिलाडी' म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून ट्रोल होतोय. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 29 मे रोजी मुबंईत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नानेही मतदान केले. मात्र अक्षय कुमार कुठेही दिसला नाही. अक्षय कुमार कॅनडा या देशाचा नागरिक असल्यामुळे तो मतदान करु शकला नाही, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्याला ट्रोल केले जात आहे.

कँनडाच्या नागरिकत्वावरून ट्रोल होत असतानाच आता अक्षय कुमारचा एक जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल केला जात आहे. हा व्हिडीओ कॅनडामध्ये शुट केलेला आहे. अक्षय कुमार या व्हिडीओमध्ये कॅनडावासियांना सांगतो की, "मी माझ्या फिल्मी करिअरमधून निवृत्त झाल्यानंतर कॅनडामध्ये स्थायिक होणार आहे."

हा व्हिडीओ कॅनडामधील टोरांटो येथील आहे. टोरांटोमधील नागरिकांना अक्षय कुमार म्हणतो की, "मला तुम्हाला सांगायचं आहे की, हे (टोरांटो, कॅनडा) माझं घर आहे. मी इंडस्ट्रीमधून (फिल्मी जग) निवृत्त झाल्यानंतर कॅनडामध्ये स्थायिक होणार आहे."