मुख्यमंत्र्यांना प्रांत मिळेना ? तरीही मध्यरात्री 134 तहसीलदार -उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

मंत्रालय
 13 Jun 2023  257

* राज्यातील 67 उपजिल्हाधिकारी तर 67 तहसीलदारांच्या बदल्या 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 13 जून 

 

निर्णय गतिमान,महाराष्ट्र वेगवान अशी प्रतिमा निर्माण करणाऱ्या राज्य सरकारची गतिमानता पुन्हा एकदा पाहावयास मिळाली आहे. त्याच कारण म्हणजे सोमवारी मध्य रात्री राज्यातील चक्क 67 उपजिल्हाधिकारी आणि 67 तहसीलदार अशा एकूण 134 अधिकाऱ्यांचे बदली आदेश मंत्रालयातून धडकले. त्यामुळे बदली आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रालय मध्यरात्रीपर्यंत जागे राहत असल्याबाबतही आश्चर्य व्यक्त होत आहे. 

 

तर दुसरीकडे राज्यातील बहुतांश बदलीस पात्र प्रांत अधिकाऱ्यांच्या बदल्या नियुक्त्या होत असतांना दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वगृहः असलेल्या ठाणे शहराचे प्रांत अधिकारी बदलीस पात्र असूनही अद्याप नव्या प्रांत अधिकाऱ्यांच्या नियुक्ती बाबत निर्णय होत नसल्याबाबतची कुजबुज महसूल विभागात सुरु झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे प्रांत अधिकाऱ्यांसाठी भाजप नेत्यांकडून मोठ्या शिफारशी आल्या आहे.  यात मंत्रिमंडळातील एक भाजप नेते, एक खासदार आणि एक केंद्रीय राज्यमंत्री यांचा समावेश असून यामुळे आपल्याच मतदार संघात आपल्याच मर्जीतील अधिकारी नियुक्ती करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसमोर पेच निर्माण झाल्याची माहिती आहे. त्यामुळेच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदार संघातील प्रांत अधिकाऱ्यांची बदली करून त्याठिकाणी थेट वाशीम जिल्यातील अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. तर या ठिकाणी असलेल्या प्रांत अधिकाऱ्यांना कमी महत्वाच्या पदावर नियुक्त केले गेले. मात्र ठाणे प्रांत अधिकारी नियुक्ती बाबत अद्याप काहीही निर्णय होत नसल्याने महसूल विभागात चर्चेचा विषय ठरला आहे.

           राज्य सरकारने सोमवारी रात्री उशिरा निर्गमित केलेल्या तहसीलदार व उपजिल्हाधिकारी यांचे बदली आदेश खालील प्रमाणे ,