23 उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

मंत्रालय
 29 May 2020  833

नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या 23 उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 29 मे 

राज्यातील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या  23 उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या महसूल विभागाने केल्या आहे. यात माजी गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांचे खाजगी सचिव म्हणून काम केलेले उपजिल्हाधिकारी श्यामकांत म्हस्के यांची नियुक्ती अकोला जिल्हातील आकोट उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे खाजगी सचिव म्हणून काम केलेले उपजिल्हाधिकारी मनोहर पोटे यांची नागपुर विभागीय आयुक्त कार्यालयात सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.