राज्यातील चार सनदी अधिकाऱ्यांना प्रधान सचिव पदी बढती

मंत्रालय
 31 Dec 2019  595

अश्विनी भिडे यांच्यासह चार आयएएस अधिकाऱ्यांना प्रधान सचिव पदी बढती

लोकदूत वेब टीम
मुंबई 31 डिसेंबर

मेट्रो वूमन आणि एका रात्रीतून 2 हजार पेक्षा अधिक वृक्षांची कत्तल करणाऱ्या अधिकारी म्हणून परिचित असलेल्या मुंबई मेट्रो रेल्वे कार्पोरेशन च्या मुख्याधिकारी अश्विनी भिडे यांच्यासह चार आयएएस अधिकाऱ्यांना प्रधान सचिव पदी बढती मिळालेली आहे.1995 च्या तुकडीतील सनदी अधिकारी असलेल्या अश्विनी भिडे, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव के एच गोविंदराज, आंतरराज्यीय प्रतिनियुक्तीवर आंध्र प्रदेश राज्यात कार्यरत असलेल्या राधिका रस्तोगी आणि नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले विकास रस्तोगी यांचा या बढतीत समावेश आहे.
मुंबई मेट्रो कारशेड साठी आरे येथे रात्रभरात तब्बल 2 हजार पेक्षा अधिक झाडांची कत्तल केल्याने मेट्रो वुमन  अश्विनी भिडे या झोतात आल्या होत्या. सध्या हे चारही अधीकारी आहे त्याच जागांवर कार्यरत राहणार आहे.