मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

मंत्रालय
 28 Nov 2019  487
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फडणवीसांनी टोला

* शेतकऱ्यांना दोन दिवसात मोठी मदत
* राज्यात दहशतीचे वातावरण राहणार नाही
लोकदूत वेबन्यूज
मुंबई 28 नोव्हेंबर

राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच उद्धव ठाकरे यांनी आपल्या ठाकरे शैलीत माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार कोणत्या उद्देशाने काम करेल यासाठी किमान समान कार्यक्रम तयारकरून राज्यातील जनतेला एक ग्वाही दिली. परंतु यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार फक्त कोकण आणि मुंबई याच विभागासाठी काम करत असल्याची टीका केली.या टिकेला उत्तर देत त्यांनी मुख्यमंत्री पद उपभोगले आहे. त्यामुळे सरकार एका विभागाचे असते की राज्याचे याचा अभ्यास करून सांगावे असा खोचक टोलाही लगावला.
शपथविधी झाल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथी गृह येथे कॅबिनेट ची पहिली मिटिंग घेतली.त्यानंतर प्रसार माध्यमांशी माहिती देतांना महाराष्ट्राच्या जनतेला नमस्कार करतो आणि विश्वास देतो की हे सरकार सर्वसामान्य माणसाचं सरकार असेल अशी ग्वाही दिली. राज्यात कुणालाही दहशत वाटेल असं वातावरण हे सरकार राहू देणार नाही. आज पहिली जी बैठक झाली त्यानंतर मला खरंच एका गोष्टीचा आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्ल्याचं संवर्धन करण्यासाठी २० कोटींचा निधी मंजूर करण्यात आले. अभिमान वाटावा अशीच ही बाब असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांची महाराष्ट्रातला शेतकरी त्रस्त आहे, अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात आहे. मी मुख्य सचिवांना असे निर्देश की जी मदत दिली आहे गेली त्याचं वास्तव चित्रण द्यावं. एक ते दोन दिवसात ते चित्र स्पष्ट होईल. शेतकऱ्यांना तुटपुंजी नाही तर मोठी मदत करणार येत्या दोन दिवसात मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. आजपर्यंत काय काय घडलं आहे? शेतकऱ्यांना काय मदत मिळाली? मिळाली नाही मिळाली? काहींना कर्जमाफीची पत्रं मिळाली आहेत. मात्र कर्जमाफी दिलेली नाही. मला वास्तव जाणून घ्यायचं आहे. घोषणांचा पाऊस झाला आहे पदरात काही पडलेलं नाही हे आम्हाला समजलं आहे. असाही टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिलीच मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली. या बैठकीत हे दोन निर्णय घेण्यात आले अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. शेतकऱ्यांना मदत करणं हे आमचं कर्तव्य नाही तर तो आमचा निश्चय आहे असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. आपला महाराष्ट्र क्रमांक एकचं राज्य आपण करु असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.

याच पत्रकार परिषदेत शिवसेना आता सेक्युलर झाली आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा सेक्युलर म्हणजे काय? त्याची व्याख्या तुम्हीच आम्हाला सांगा असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी प्रतिप्रश्न करुन पत्रकारांना उत्तर दिलं.