जिल्हापरिषद अध्यक्ष पदाची सोडत जाहीर

मंत्रालय
 19 Nov 2019  956

 

 

 

 

 

 

 

पहा जिल्हापरिषद अध्यक्ष पदाची आरक्षण सोडत 

लोकदूत वेबन्यूज

मुंबई 19 नोव्हेंबर 

जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची सोडत आज मंत्रालयात पार पडली. त्यावेळी राज्यभरातील सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील एकूण ३४ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या आरक्षणाच्या सोडतीवर एक नजर टाकूया ग्राफीक्सच्या माध्यमातून

 

-  जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण 

*अनुसूचित जाती (सर्वसाधारण) : सोलापूर, जालना*

*अनुसूचित जाती (महिला) : नागपूर,  उस्मानाबाद*

*अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : नंदुरबार, हिंगोली*

* *अनुसूचित जमाती (महिला) : पालघर, रायगड, नांदेड*

* *नागरिकांचा मागास प्रवर्ग* ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसईबीसी *(सर्वसाधारण) : लातूर, कोल्हापूर, वाशीम, अमरावती*

* *नागरिकांचा मागास प्रवर्ग -* ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसईबीसी *(महिला) : ठाणे, सिंधुदुर्ग, सांगली, वर्धा, बीड*

* *खुला (सर्वसाधारण) : रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा*

* *खुला (महिला) : जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर*